वसई / विशेष प्रतिनिधी
वसई-विरार शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. वाढत्या गर्दीमुळे ही बस सेवा अपुरी पडू लागली आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांचा ताण लक्षात घेता अधिक बसची आवश्यकता आहे.
दिवाळीपूर्वी शहरात पहिल्या टप्प्यात तब्बल ४० नवीन ई-बस दाखल होणार आहेत. वसई-विरार शहरात मोठ्या संख्येने प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. मात्र सध्यास्थितीत महानगरपालिकेकडे असलेल्या बसची संख्या अपुरी पडत आहे. सध्या महानगरपालिकेकडे १२० बस असून त्यापैकी ४० ई-बस आहेत. या सर्व बसच्या माध्यमातून ३६ वेगवेगळ्या मार्गांवर सेवा दिली जात आहे.
यातून दररोज ६५ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. बससेवेची संख्या अपुरी असल्याने अनेक वाहतूकविषयक अडचणी निर्माण होत आहेत.




Leave a comment